पुणे- महान्यूज लाईव्ह
माहिती व प्रसारण सेवेतील अत्यंत महत्वाचा टप्पा आपला देश गाठतोय. आज दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी 5G सेवेची सुरवात करतील. पहिल्यांदा देशातील १३ शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये ही सेवा सुरू होईल.
सुरवातीच्या टप्प्यात सध्याच्या फोर जी एवढीच फाईव्ह जी साठी किंमत असेल असे सांगितले जात असून त्यानंतर मात्र मोबाईल कंपन्या 5G ज्या सेवेच्या किंमतीत वाढ करतील असे सांगितले जात आहे.
आज पुणे, मुंबई, दिल्लीसह कोलकाता, चेन्नई, गांधीनगर, जामनगर, हैदराबाद, लखनौ, बंगळूरू, अहमदाबाद चंदीगड या शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही शहरे निवडण्यात आली आहेत. सन २०२३ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशात 5G चे साम्राज्य असेल. आताही आज सुरू होणारी सेवा प्रत्यक्षात ग्राहकांना मिळायला दिवाळी उजाडेल..