बारामती : महान्यूज लाईव्ह
पतीबरोबर वाद झाल्यानंतर पत्नीला तिच्या माहेरी सोडायला नवरा गेला. माहेरी घरी पोचताच बायकोने थेट गज घेतला आणि तुझी आणि तुझ्या आईची लय नाटकं झाली म्हणत बायकोने नवऱ्याच्या डोक्यात गजच घातला.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपी पत्नी करीना इक्बाल अत्तार हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल हा मजुरीचे काम करतो. २७ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
करीना व इक्बाल यांच्यामध्ये प्रापंचिक कारणाने वाद झाला. इक्बाल वडगाव निंबाळकर येथे राहतो. तर त्याची पत्नी करीना हिचे माहेर वडगाव निंबाळकर येथीलच आस्वाद हॉटेलच्या पाठीमागे आहे. वाद झाल्यानंतर इक्बाल हा पत्नीला घेऊन तिकडे गेला आणि नंतर त्याच्या आईकडे गेला.
त्यानंतर काही वेळाने तो पुन्हा करीना हिच्याकडे जाऊन आपण आईकडे जाऊन राहू असं म्हणाल्यावर करीना हिने मी येणार नाही असे सांगून तुला जायचं असेल तर तू एकटा जा असे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली.
त्यामुळे रागावलेल्या करीना हिने घरातील गज घेतला आणि तुझी आणि तुझ्या आईची लय नाटकं झाली म्हणत तिने नवऱ्याच्या डोक्यात गजच घातला. तसेच कानावरही गज मारला. त्यानंतर करीना देखील घरातून निघून गेली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.