दौंड: महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन येथील एका महिलेला तू माझ्या मुली सारखी आहे असे म्हणत हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी दिली. नंतर काही दिवसांनी तिला रूममध्ये कोल्ड्रिंक्स मध्ये बेशुद्धीचे औषध घेऊन तिच्यावर तीन-चार दिवस अत्याचार केल्याची घटना दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे घडली आहे.
या पुढील धक्कादायक बाब अशी की, या पीडित महिलेला या नराधमाची पत्नी आणि मुलाने हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीव मारून धरणात फेकून देऊ अशी धमकी दिली. या प्रकरणी दौंड पोलिसांनी तिघांना गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
प्रविण ठकुरे, प्रगती ठकुरे, प्रथमेष प्रविण ठकुरे (रा. कुरकूंभ, ता. दौंड, जि. पुणे ) अशी या आरोपींची नावे आहेत. २१ मार्च ते २५ मार्च २०२२ रोजी कुरकुंभ येथील हॉटेल कुबेर मध्ये ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ही रेल्वे स्टेशन येथे पोस्टर लावण्याचे काम करत होती. त्यावेळी प्रविण ठकुरे याने कुरकुंभ येथील कुबेर हॉटेल आहे. तिथे तुला मॅनेजरचे काम देतो, वीस हजार रुपये महिना पगार देतो. तू माझ्या मुलीसारखी आहे असे सांगितले.
पीडित महिलाही काम मिळाल्याने प्रविण ठकुरे याच्या सोबत गेली, मात्र त्याने हॉटेलवर न नेता तो राहत असलेला रूममध्ये नेले व दुसऱ्या दिवशी हॉटेलवर कामाला नेले. त्यांनतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रूमवर गेली. असे रोज काम चालू होते.
मात्र २१ मार्च २०२२ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पिडीत महिला हॉटेलवरून रूमवर आली. तिला सर्दी झाल्याने नराधमाने लिंबू सरबत कोल्ड्रींक्स दिले. याने सर्दी जाईल असे सांगितले. पीडित महिला कोल्ड्रींक्स घेतल्यानंतर झोपली. सकाळी उठली तेव्हा तिला धक्काच बसला. यावेळी प्रविण ठकुरे याने आता तु काय मुलगी नाही राहीली. आरडाओरडा करायचा नाही, तुझे फोटो आहेत माझेकडे अशी धमकी देऊन पुन्हा दारू पिऊन रात्री मारहाण केली व अश्चिल व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सलग दोन दिवस जबरदस्तीने अत्याचार केला.
हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जिवे मारून उजनी धरणात टाकेन अशी धमकी या तिघांनी दिली. या भितीने पिडीत महिलेने कोणाला काही सांगितले नाही, मात्र त्यांनतर काही दिवसांनी प्रविण ठकुरे यास दौंड पोलीस स्टेशन येथे अटक केली आहे असे समजल्यानंतर पीडित महिलेने दौंड पोलीस स्टेशन येवून घडलेला प्रकार सांगितला. ह्या प्रकरणी दौंड पोलिसांनी प्रविन ठकुरे, त्यांची पत्नी प्रगती, मुलगा प्रथमेष यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.