दिल्ली – महान्यूज लाईव्ह
बिहारमधील पाटण्यात युनिसेफच्या सशक्त बेटी, समृध्द बिहार या कार्यक्रमात उपस्थित महिला विकास महामंडळाच्या मुख्याधिकारी कौर यांनी नववी व दहावीतील विद्यार्थिनींनी विचारलेल्या एका प्रश्नावर वरील अभ्यासपूर्ण वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे उपस्थितांनी तर आश्चर्य व्यक्त केलेच,शिवाय अलिकडच्या काळात आयएएस अधिकारी एवढे अनिर्बंध का वागताहेत याचेही कोडे पडले.
वास्तविक पाहता हा जो कार्यक्रम पाटणा येथे होता, तो मुळातच युनिसेफच्या सेव्ह द चिल्ड्रन या उपक्रमातील सशक्त बेटी समृध्द बिहार या कार्यक्रमाचा भाग होता. या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने मॅडमला विचारले की, सरकार अनेक मोफत योजना सुरू करते. मग त्यामध्ये टिव्ही, गणवेश, शिष्यवृत्ती, लॅपटॉप, तांदूळ अशा अनेक योजना असतात. अनेक योजनांचा वैयक्तिक लाभही देते. मग हे सरकार अत्यंत गरजेचे २०-३० रुपयांचे सॅनिटरी पॅड मोफत का उपलब्ध करून देऊ शकत नाही असा तिचा अत्यंत सहजसोपा, या कार्यक्रमास साजेसा प्रश्न होता.
सॅनिटरी पॅडची तुलना निरोधशी ? IAS अधिकाऱ्याच्या हजरजबाबीपणाला काय म्हणावे#iasofficer #biharias #government #student pic.twitter.com/EPifrauN3h
— Mahadev Parvti Ramchandra (@mahadevpr) September 28, 2022
मॅडम घरून येतानाच बिथरल्या होत्या की काय ठाऊक नाही, पण त्यांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडताना हा देश त्यांच्याच बापाचा आहे असे समजून आपले अतंर्ज्ञान उघड केले. त्या म्हणाल्या. २०-३० रुपयांचे पॅड मोफत द्यायचे, उद्या जीन्स, पॅन्टही तुम्हाला मिळेल. मग त्यानंतर तुम्ही सुंदर चप्पल मागाल, तीही सरकार देऊ शकते. अगदीच उद्या कुटुंब नियोजनाचा विषय आला, तर लोकांना निरोधही फुकटच द्यावे लागतील. तुमच्या फुकट मागण्यांना काही शेवट आहे की नाही? सगळं फुकट घेण्याची सवय का लावून घेताय? स्वतःला असे निर्माण करा की, फुकट घ्यायची गरजच पडणार नाही.
मग त्या विद्यार्थिनींनी देखील मॅडमला काही सोडले नाही, विद्यार्थिनी म्हणाल्या, मग सरकार मत मागण्यासाठी कसे येते? मग मॅडम आणखी पुढचंच बोलल्या, देऊ नका ना मग मतदान.. फक्त मग त्यानंतर पाकिस्तानसारखं हुकुमशाहीत, अनागोंदीत जावं लागेल..पैशासाठी मत देता का?