दौंड : महान्यूज लाईव्ह
रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) दौंड तालुका कार्यकारिणी पश्चिम महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी नुकतीच जाहीर केली असून तालुका अध्यक्षपदावर आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते रवींद्र कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची काही दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्या अनुषंगाने वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड शहरात पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करून दौंड तालुक्याची कार्यकारणी जाहीर केली.
ती पुढील प्रमाणे अध्यक्ष -रविंद्र कांबळे (लिंगाळी), सरचिटणीस -अजय गायकवाड (कडेठाण), कार्याध्यक्ष – गणेश साळवे (रावणगाव), उपाध्यक्ष- रामभाऊ कदम (भांडगाव), उपाध्यक्ष- नवनाथ गायकवाड (कुरकुंभ), उपाध्यक्ष- दशरथ मोरे (देऊळगावगाडा), उपाध्यक्ष -विशाल जगताप (बोरीबेल), संघटक- दिपक शिंदे (हातवळण), सचिव-कैलास कांबळे (स्वामी चिंचोली).
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर सुरू आहे. पुणे जिल्ह्यात हा पक्ष मजबूत करण्यासाठी तालुका पातळीवर पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर निवड केली जात आहे. दौंड तालुक्यात ही विविध पदांवर निवड करण्यात आली असल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांनी सांगीतले. याप्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष असित गांगुर्डे, राज्य महिला अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडी राज्य सरचिटणीस खाजा शेख, पुणे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण उपस्थित होते.