विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : मी पुण्याचा पालकमंत्री होतो. म्हणजे जिल्ह्यात आठवड्यातून एक दिवस मला द्यावाच लागायचा. मी सकाळी साडेसात सात वाजल्यापासून कौन्सिल हॉल किंवा सर्किट हाऊसला बसून कामाचा निपटारा करायचो. आम्ही सतत लक्ष द्यायचो. पण कामाचा व्याप खूप असतो. आता ज्यांच्याकडे सहा सहा जिल्हे दिलेत, ते कसं पेलवणार आहेत? काय होणार आहे. मला माहिती नाही, पण त्यांना शुभेच्छा. फक्त लोकांची कामे थांबू नयेत असा टोला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मारला.
बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, आता बघा पालकमंत्र्याच्या नेमणुका केल्यात चांगली गोष्ट आहे. काही जिल्ह्यांमध्ये एकच पालकमंत्री दिलेत. काही पालकमंत्र्यांना दोन जिल्हे दिलेत. देवेंद्र फडणवीसांकडे तर सहा जिल्हे आहेत. तुम्हाला सांगतो, हा अजित पवार पुण्याचा पालकमंत्री होता, तरी माझ्या नाकी नऊ यायचं.
शिंदे सरकार तुम्हाला संधी कशी मिळाली? काय मिळाली काय? तुम्ही गद्दारी केली की, नाही केली? की आणखीन काय केलं? हे महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्या खोलात मी काही जास्त जात नाही. पण त्याच्यातून लोकांची कामे तरी झटपट झाली पाहिजेत अशीही टीका अजित पवार यांनी केली.