पुणे महान्यूज लाईव्ह
कोंबडी तंगडी धरून पळाली हे चित्रपटातील गाणे तुम्हाला माहिती असेलच.. पण लोणीकाळभोर येथे कुत्र्याने कोंबडीची तंगडी धरून तिला पळवून नेली. त्यामुळे अस्वस्थ झालेला कोंबडीचा मालक कुत्र्याच्या मालकाच्या घरी गेला आणि त्याने आमची कोंबडी तुमच्या कुत्र्याने पळवून नेली असे सांगितले. त्यावर शाब्दिक वाद वाढत गेला आणि कुत्र्याकडील आठ जणांनी कोंबडीच्या मालकाला बदड बदड बदडले..
या घटनेत लोणीकाळभोर पोलिसांनी अनिकेत रवींद्र काळभोर व रवींद्र काळभोर यांना अठक केली आहे, तर मंगेश काळभोर याच्यासह त्याच्या ४ ते ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणी कोंबडीचा मालक धनंजय बाळासाहेब वीरकर यांनी लोणीकाळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
पोलिस सत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकाळभोर येथील रुपनरवस्तीत हा तमाशा घडला. कोंबडीवाला धनंजय वीरकर व कुत्र्यावाला अनिकेत काळभोर हे शेजारी राहतात. वीरकर यांची कोंबडी काळभोर यांच्या कुत्र्याने पळवली. त्यावरून वीरकर हे काळभोर यांच्या घरी गेले. तेव्हा वीरकरांना शिवीगाळ करीत काळभोर पितापुत्रांनी त्याला धमकी दिली.
ही घटना घडल्यानंतर काही तासाने अनिकेत काळभोर याने मित्रांना बोलावून घेतले व रात्रीच्या साडेसात वाजण्याच्या सुमारास शेतीच्या बांधाच्या जुन्या वादाचे निमित्त करून वीरकर यांच्यावर हल्ला केला. या घटनेत वीरकर यांना मारहाण करून त्यांची प्रती व बहिणीलाही मारहाण केली.