• Contact us
  • About us
Saturday, February 4, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खरी शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राला दसरा मेळाव्यातून दाखवून देऊ

Maha News Live by Maha News Live
September 25, 2022
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, मराठवाडा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, व्यक्ती विशेष, Featured
0

२०२४ च्या आत मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही

सलमान मुल्ला, उस्मानाबाद

मराठा समाजाला आजपर्यंत टिकाऊ आरक्षण दिलेले नाही. त्यांना आरक्षणासाठी अजूनही वाटच बघावी लागत आहे. मागच्या सरकार प्रमाणे आम्ही आश्वासन देणार नाही तर २०२४ च्या आत मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत.

तसेच शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे आम्ही खरे पाईक आम्ही आहोत. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचा अधिकार नसून त्यांच्या विचारांना आम्हीच पुढे घेऊन जाणार आहोत. कारण आमची बांधिलकी वंदनीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना व शिवसैनिकांशी आहे. खरी शिवसेना कोणाची आहे यावर कोणीही दवा करू नये. आम्ही उद्याच्या मुंबई येथील दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाजत गाजत शिवसैनिक आणून खरी शिवसेना कोणाची आहे ? हे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून देऊ अशी गर्जना आरोग्य मंत्री तथा शिवसेना नेते डॉ तानाजीराव सावंत यांनी हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क अभियान कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केली.

दरम्यान, ठाकरे गट , राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उस्मानाबाद येथील पुष्पक पार्क येथे शिवसेना (शिंदे गट) च्यावतीने हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क अभियान, कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन २४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना उपनेते, आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, प्रशांत बाबा चेडे, अनंत वाघमारे, लक्ष्मीकांत हुलजुते, सनी पवार, गजानन चोंदे, ईश्वर शिंदे, मंदार मुळीक, अमोल पाटील, संजय गाढवे, सुलतान शेख, अजित लाकाळ, बळी सुरवसे, संभाजी भडंगे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, शिवसैनिकांच्या मेळाव्याचे स्वरूप काय असते हे तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथे घेतलेल्या मेळाव्यात दाखवून दिले होते. मी पोटतिडकीने शिवसैनिकांशी संपर्क साधत असून सत्तेचा ताम्रपट कायम कोणाचाही नसतो. ज्यांनी लाठ्या- काठ्या खाल्ल्या, त्यांच्या भावनांचा आदर व्हायला हवा होता. तसेच २०१९ ची निवडणूक भाजप शिवसेना यांनी एकत्र लढली. जनतेने त्यांना बहुमत दिले. मात्र जनमताचा आदर न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले.

हे आम्हाला व शिवसैनिकांना अजिबात आवडले नव्हते. त्यामुळे आमचा व शिवसैनिकांचा स्वाभिमान मातीत मिळू देणार नसल्याचे सर्वप्रथम मी उद्धव ठाकरे यांना मातोश्री सोडताना सांगितले होते. ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही शिवसैनिक व जनतेसाठी काय केले असा प्रश्न विचारीत शिवसैनिकांनी फक्त जय भवानी जय शिवाजी करायचे हे यापुढे चालणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

त्यामुळेच आम्ही सत्तापालट केली असून यापुढे सर्व कामे शिवसैनिकांनाच मिळतील. कोणत्याही नेत्याला व नेत्याच्या नातेवाईकाला दिली जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या मेळाव्यास जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

Next Post

वेदांतानंतर फोन पे ची बारी.. गब्बर होतायेत शेजारी..!
महाराष्ट्र पडतोय आजारी .. व्वा रे सत्ताधारी! आमदार रोहित पवार यांची चारोळीतून सरकारवर टोलेबाजी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खानापूरात अभिषेक चा खून केला आणि गाठले त्यांनी रत्नागिरी.. पण कानून के भी हात लंबे होते है.. फिर गुनहगार ओंकार हो या रहीम!  

February 4, 2023

हरीण मारले तर होतो गुन्हा; पण हरीण वाचवणं हा सुद्धा ठरला त्यांचा गुन्हा! बारामतीवरून दौंडला निघालेल्या दुचाकीला हरीण आडवे गेले आणि हरणाला वाचवताना एकाचा मात्र जीव गेला..!

February 4, 2023

जो जो चीनच्या नादाला लागला.. तो तो कंगाल जाहला..! श्रीलंकेनंतर पाकिस्तानची अवस्था वाईट! एका डॉलरचा दर पोहोचला 271 रुपयांवर!

February 4, 2023
ऐका हो ऐका.. इंदापूरात पीडब्ल्यूडीच्या कामाने प्रवाशीही गहिवरला.. खातं एवढं प्रामाणिक की, रात्री स्पीड ब्रेकर उभा केला.. तिसऱ्या दिवशी त्याचापार भुगा झाला..!

ऐका हो ऐका.. इंदापूरात पीडब्ल्यूडीच्या कामाने प्रवाशीही गहिवरला.. खातं एवढं प्रामाणिक की, रात्री स्पीड ब्रेकर उभा केला.. तिसऱ्या दिवशी त्याचा
पार भुगा झाला..!

February 4, 2023

अभ्या तू फिक्स… असं लिहून त्यांनी अगोदर स्टेटस ठेवले होते.. पूर्वीच्या काळी दरोडा टाकताना सांगून टाकायचे.. आता सांगून गावागावात खून करू लागलेत, मिसरूड न फुटलेली मुलं..

February 4, 2023

टकारी समाजाचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचं मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचं आश्वासन!

February 3, 2023

पाटसला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन.!

February 3, 2023

शांतताप्रिय खानापूर गावात वीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून! गावगुंडाने का केला खून? गाव चिडले!

February 3, 2023

आता राज्यात प्रत्येक शाळेत आजीआजोबा दिवस साजरा होणार.. विटीदांडूपासून आजीच्या बटव्यापर्यंतचा प्रवास होणार..नातू आजीआजोबांसाठी करणार डान्स..!

February 4, 2023

एकजूट मविआची दिसली.. महाराष्ट्रातील विचित्र राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या भाजपविषयीची सुशिक्षितांच्या मतातून दिसली..!

February 3, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group