संदीप मापारी पाटील बुलढाणा
दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जागा मिळाल्याबदल शिवसेनेकडून फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
या वर्षी दसरा मेळावा हा शिवतीर्थावर या वर्षी कोणी साजरा करावा यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी दोन्ही गटाकडून जागेसाठी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उच्च न्यायालयात दाद मागितली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला.
त्यामुळे लोणार शिवसेना तालुकाप्रमुख संदीप पाटील मापारी यांच्या नेतृत्वात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख संदीप मापारी, शहरप्रमुख गजानन जाधव, माजी नगरसेवक अस्लम खान, युवा सेना तालुकाप्रमुख शाम राऊत, जेष्ठ नेते किसन मोरे, सुदन अंभोरे, कैलास अंभोरे, युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत मादनकर, बाळू सरदार, समाधान मापारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.