सामाजिक

मुलीला भेटण्यासाठी निघाले होते, आईबाप… त्यांची काय चूक होती? शिरूर तालुक्यातील वृत्तपत्रविक्रेत्या दांपत्याचा अपघाती मृत्यू!

शिरूर – महान्यूज लाईव्ह

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील पती पत्नीचा टँकर अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून तळेगाव ढमढेरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात दत्तात्रय झळके (वय ४८वर्षे) पत्नी सुवर्णा दत्तात्रय झळके यांचा मृत्यू झाला आहे.कुटुंबातील पती पत्नीच्या दुर्दैवी अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर असे की,तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील दत्तात्रय झळके हे गेल्या अनेक वर्षांपासून तळेगाव ढमढेरे परिसरात वृत्तपत्र वितरणाचे काम करतात. झळके हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवर मुलीला भेटण्यासाठी अहमदनगरकडे निघाले होते.

मात्र तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अहमदनगर जवळ कल्याण फाटा येथील कांदा मार्केट जवळ आले असताना टँकर नंबर (एम एच १६ ए ई ९६०१) वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात पेपर वितरक झळके व पत्नी सुवर्णा यांना गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे यांसह पोलिस अंमलदार यांनी तसेच कोतवाली पोलिस स्टेशन च्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. तर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

मयत दत्तात्रय झळके हे तळेगाव ढमढेरे आयडीबीआय बँकेत शिपाई म्हणून देखील काम करत होते. तळेगाव ढमढेरे परिसरात ते मनमिळाऊ स्वभावामुळे परिचित होते. अपघाताची वार्ता परिसरात कळताच मोठी शोककळा पसरली आहे.

tdadmin

Recent Posts

आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्वीट! पहा व्हिडिओ!

बारामती : महान्यूज लाईव्ह इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ…

3 hours ago