पुणे महान्यूज लाईव्ह
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा दौरा असतानाच त्यांच्या फटकळ स्वभावाची मात्रा भाजपच्याच बड्या नेत्याला लागू पडली.. बैठकीनंतर फोटो काढण्याची मागणी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला सितारामन यांनी चांगलेच झापले. त्याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला.
निर्मला सितारामन या त्यांच्या फटकळ स्वभावाबद्दल परिचित आहेत. पुण्यात झालेल्या बुथप्रमुखांच्या बैठकीनंतर पुणे जिल्ह्याच्या भाजप नेत्यांनाही त्याचा अनुभव आला. बुथप्रमुखांच्या बैठकीनंतर त्यांच्यासमवेत छायाचित्र काढण्याची विनंती केलेल्या पदाधिकाऱ्यालाच सितारामन यांनी फटकारल्याची घटना घडली. अशा पध्दतीने केलेली मागणी सितारामन यांना रुचली नसल्याची चर्चा होती.
त्याची चर्चा काल होतीच, मात्र आजही त्याची चर्चा बारामती तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळाली. एकीकडे बारामती तालुक्यात एखाद्या कार्यक्रमासाठी पोचल्यानंतर जे लोक निवेदन देतील, त्यांचे निवेदन स्विकारत पुढे जाण्याची सवय लोकप्रतिनिधींना लागली आहे.
आज मात्र बारामतीत पोचलेल्या सितारामन यांना सहजासहजी निवेदन देण्यासाठी पुढे आलेल्यांना तसे निवेदन देता आले नाही, थेट निवेदन देऊ पाहणाऱ्यांचे निवेदनही सितारामन यांनी स्विकारले नाही. एकाने मात्र थेट त्यांच्यापुढेच ते निवेदन धरले, सुरवातीला त्याचा नकार देणाऱ्या सितारामन यांनाही ते निवेदन स्विकारावेच लागले. इतर पदाधिकाऱ्यांनी अगोदर निवेदन स्विकारायचे, मग प्रभारींकडे द्यायचे आणि नंतरच प्रभारी सितारामन यांच्याकडे ते निवेदन देणार अशी ती व्यवस्था होती, त्या अनाहूत व अनाकलनीय व्यवस्थेमुळे थेट निवेदन देणाऱ्यांची मात्र गोची झाली.