सलमान मुल्ला, उस्मानाबाद.
बार्शी येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनी बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुणवंत शिक्षक व उपक्रमशील शाळा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात अभिनव प्राथमिक विद्यामंदिरमधील शिक्षक अनंत कृष्णा लंकेश्वर यांना “गुणवंत शिक्षक” पुरस्काराने गौरविण्यात आले..
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत, मुख्य लेखापाल मिनाक्षी वाकडे, पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, अनिल बनसोडे, संजय पाटील, दयानंद चौधरी, गणेश करे-पाटील उपस्थित होते..
या पुरस्काराबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आधार भालेराव, शिक्षिका राजश्री डोंगरे, माधुरी सोनवतीकर, रेखा मस्के, सरस्वती मोटे यांनी अभिनंदन केले.