असा आहे सितारामन यांचा इंदापूरचा दौरा..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून बारामतीचा दौरा आटोपून आज शुक्रवारी (दि.२३) इंदापूर तालुक्यात विविध कार्यक्रमानिमित्त इंदापूर तालुक्यात येणार आहेत. आज सायंकाळी ४ : ३० वाजता जंक्शन येथे पालखी महामार्गाची पाहणी करतील.
त्यानंतर सितारामन साडेपाच वाजता शेळगाव येथे मतदारांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता निमगाव केतकी येथील श्री संत सावतामाळी मंदिरात आरती सेवा सप्ताह रक्तदान प्रमाणपत्र वाटप ..
रात्री सात वाजता इंदापूर शहरातील बुद्ध विहारास भेट देणार आहेत. रात्री आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जाणार आहेत.
रात्री नऊ वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील ललेंद्र शिंदे यांच्या घरी जेवण करणार आहेत.
रात्री दहा वाजता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी मुक्कामी असणार आहेत.
शनिवारी (दि.२४) रोजी सकाळी ९: ३० वाजता इंदापूर शहरातील गुरुकृपा मंगल कार्यालयात युवक आणि नव मतदारांसोबत सितारामन संवाद साधणार आहेत.
सकाळी १० वाजता मंत्री सितारामन या दौंड तालुक्यातील पाटसकडे मार्गस्थ होणार आहेत.