विक्रांत यादव – महान्यूज लाईव्ह
वाई – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अपत्यप्राप्ती हा विषय जटिल बनत चालला आहे, अशा स्थितीत विवाह होऊन काही वर्षे उलटल्यानंतरही मूल होत नसल्यास नैराश्य येते.. पण म्हणून कोणी दोघांचेही आयुष्य संपवते का? वाई तालुक्यातील कणूर येथील घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हळहळला..
कणूर येथील तानाजी लक्ष्मण राजपुरे व त्यांची पत्नी पूजा या दोघांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बावधन शेजारी कणूर हे गाव आहे. गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तानाजी व पूजा यांनी राहत्या घरीच अॅंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. प्राथमिक अंदाजानुसार मूलबाळ होत नसल्याने हे दांपत्य नैराश्यात होते. पुढील तपास वाई पोलिस करीत आहेत.