सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – माजी मंत्री रामदास कदम यांनी गुहागर येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यामुळे इंदापूरच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. रामदास कदम यांचा निषेध करत बुधवारी इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने रामदास कदम यांच्या प्रतिनिधीक पुतळ्यास जोडे मारत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
इंदापूर शहरातील जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, उपजिल्हा प्रमुख संजय काळे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शहरप्रमुख महादेव सोमवंशी, युवा सेना तालुका युवा अधिकारी सचिन इंगळे,वसंत आरडे आदींसह इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी रामदास कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.