दौंड : महान्युज लाईव्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा मोहिम राबवली जात आहे, त्यानिमित्त आजपासून शासकीय शिबिरे घेण्यात येणार असून या शिबिरात विविध योजनांची माहिती व लाभ देण्यात येणार आहे अशी माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.
दौंड तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद, तालुका कृषि अधिकारी, महावितरण, तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा ला गुरुवार ( दिनांक २२) सुरवात होणार आहे. या निमित्ताने विविध शासकीय योजनांची माहिती आणि दाखले, कागदपत्रे यांचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत वाटप,पीएम-किसान योजना अडचणी सोडविणे, प्रलंबीत फेर फार नोंदी निर्गती केली जाणार आहे, शिधापत्रिका वाटप,विवाह नोदणी प्रमाणपत्र यांचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे त्याच बरोबर तर नव्याने नळ जोडणी करणे, घरघुती नवीन विदयुत जोड देणे, कृषी विषयक योजनांचे संमती पत्र देणे, दिव्यांग यांना प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमीलियर, जन्म मृत्यू दाखले तसेच इतर शासकीय आवश्यक दाखले यांचे वाटप करण्यात येणार आहे.
दौड तहसीलदार कार्यालय अर्थात नवीन प्रशासकीय कार्यालयातील सेतु सुविधा केंद्रात हे शिबिर घेण्यात येणार आहे. याचा तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार संजय पाटील यांनी केले आहे.