महान्यूज करीअर अपडेट
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत संयुक्त पदवी स्तर परीक्षेची घोषणा करण्यात आली असून त्यामार्फत २० हजार जागांची भरती होणार आहे. ८ ऑक्टोबर २०२२ ही त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
भारतीय लेखा विभागात सहायक लेखाधिकारी, केंद्रीय सचिवालयात, आयबी मध्ये, रेल्वे मंत्रालयात, परराष्ट्र मंत्रालयात तसेच माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयात सहायक सत्र अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत.
सीबीडीटीमध्ये आयकर अधिकारी, सीबीआयसीमध्ये केंद्रीय अबकारी कर अधिकारी, ईडीमध्ये सहायक ईडी अधिकारी, एनसीबीमध्ये निरीक्षक, इतर मंत्रालयांमध्ये सहायक पदाच्या व कॅगमधील विभागीय लेखाधिकारी, लेखापाल, सांख्यिकी विभागात कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, टपाल मंत्रालयात पोस्टल सहायक, लष्करी अभियांत्रिकी सेवा विभागात सहायक मनुष्यबळ विभाग, वरिष्ठ लिपीक, फौजदार, कर सहायक अशा विविध पदाच्या जागांची भरती यांतर्गत होणार आहे.
या वेगवेगळ्या पदांसाठी वयाची मर्यादा किमान १८ वर्षे, किमान २० वर्षे अशी असून कमाल ३० ते ३२ वर्षे अशी आहे. अनुसूचित जाती, जमातीसाठी ५ वर्षे, ओबीसीसाठी ३ वर्षे, अपंगांसाठी १० वर्षे, ओबीसी अपंगांसाठी १३ वर्षे, अनुसूचित जाती, जमाती अपंगांसाठी १५ वर्षे, माजी सैनिकांसाठी ३ वर्षे वयात सवलत राहील.
याकरिता १०० रुपये परीक्षा शुल्क असून अनुसूचित जाती, जमाती, आरक्षित प्रवर्गातील अपंगांसाठी व माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ आहे. शैक्षणिक अर्हता पदानुसार असून त्यासाठी अधिक व सविस्तर माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या http://www.ssc.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.