मुंबई महान्यूज लाईव्ह
पत्राचाळ प्रकरणी शरद पवार यांनी बैठक घेतली होती, त्यामुळे त्यांची चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परीषद घेऊन ही चौकशी लवकरात लवकर करा, चार, आठ, दहा दिवसांत जेवढ्या लवकर चौकशी करायची ती करा असे आव्हान दिले.
पवार यांनी यावेळी या पत्राचाळ प्रकरणाच्या बैठकीतील इतिवृत्त पत्रकारांना दिले. या इतिवृत्तावर सचिवांनी स्वाक्षरी केलेली आहे. न्यायालयात जे चार्जशीट दाखल झाले, त्यात आपले नाव आहे, असे आपण म्हणता, तर चौकशी करणारी यंत्रणा कोर्टात काय म्हणते यासंदर्भात जितेंद्र आव्हान यांनी उल्लेख केल्याची माहिती पवार यांनी दिली.
दरम्यान पवार म्हणाले, चौकशी करण्याची कोणी मागणी केली असेल, तर त्याला आमची ना नाही. पण चौकशी लवकर करावी व वास्तव व आणि सत्याला धरून नसेल तर त्यावर काय भूमिका असेल हेही जाहीर करावे तसेच उगीचच पराचा कावळा करू नये असेही मत त्या्ंनी व्यक्त केले.