नांदेड : महान्यूज लाईव्ह
दोन हजारांची लाच घेताना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलिस ठाण्यातील अंमलदार बेग याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले. त्याला पकडण्यासाठी धावलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांना पाहताच त्याने दुचाकीवरून धूम ठोकली.
नांदेडमध्ये या पलायनाने खळबळ उडाली असून केवळ दोन हजारांच्या लाचेसाठी त्याने पोलिस दलाची अब्रू वेशीला टांगल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. बेग हा तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्विकारत होता. त्याने पैसे स्विकारून खिशात ठेवले. मात्र त्याचवेळी तेथे सुरू झालेल्या हालचालीवरून त्याने आपल्यावर ट्रॅप ठेवला होता हे ताडले आणि त्याने दुचाकी सुरू करून तेथून धूम ठोकली.
एसीबीच्या पोलिस उपअधिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र बेग त्यांच्या हाती लागला नाही. बेग याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यासाठीच्या पुराव्याचे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहीला.