महान्यूज लाईव्ह अपडेट
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या. या निवडणूकीच्या मतमोजणीत राज्यात २७४ ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आल्याचा दावा भाजपने तर १२८ ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व राहील्याचा दावा करण्यात आला आहे.
राज्यात आज ६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. या निवडणूकीत जनतेतून सरपंच हा मुद्दा महत्वाचा होता. राज्यात जाहीर झालेल्या २६२ ग्रामपंचायतींच्या जागांपैकी १०१ जागी भाजपचे, ५८ राष्ट्रवादीचे, २२ कॉंग्रेसचे, शिंदे गटाचे २४ तर शिवसेनेचे १४ जागी सदस्य निवडून आले.
पुणे जिल्ह्यात मात्र आंबेगाव व जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहीले. या निवडणूकीमुळे जनतेने भाजप व शिंदे गटाच्या युतीला कौल दिल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी केला आहे. तर या निकालाने मविआ ला मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.