महान्यूज करिअर अपडेट
फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय खाद्य निगम (एफसीआय) मध्ये ५ हजारहून अधिक जागांची भरती होणार आहे. कनिष्ठ अभियंता, स्टेनो व असिस्टंट या पदांसाठी ही भरती होणार आहे. याकरीता ५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
एकूण ५ हजार ४३ जागांसाठी ही भरती होणार असून जानेवारी २०२३ मध्ये याची परीक्षा होणार आहे. याकरीता कनिष्ठ अभियंता पदासाठी अभियांत्रिकीची पदवी, स्टेनो साठी द्वितीय श्रेणीसाठी ४० शब्द प्रतिमिनीट मराठी व इंग्रजीसाठी ८० शब्द प्रतिमिनीट शब्द टायपिंग अशी अट आहे. तर असिस्टंट पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक हाताळणीसह असलेली पदवी आवश्यक आहे.
या भरती परीक्षेसाठी अनुसूचित जाती, जमाती, अपंग व महिला उमेदवार वगळता इतरांसाटी ५०० रुपये परीक्षा शुल्क असून यासाठी अधिक व सविस्तर माहितीसाठी fci.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.