दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा गावठी हातभट्टी दारूवर यवत पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत मुद्देमाल जप्त करत हे व्यवसाय करणाऱ्या आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाटस, राहू, भांडगाव, वाखारी, नाथाचीवाडी, बोरीपार्धी – चौफुला या ठिकाणी बेकायदा विनापरवाना गावठी हातभट्टी दारू सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाली होती.
त्यानुसार पवार यांनी रविवारी ( दि.१८) पोलिसांचे पथके कारवाईसाठी तैनात केली. या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी एकाच दिवशी छापा टाकून मुद्देमाल जप्त करत कारवाई केली.
याप्रकरणी पाटस परिसरातील पाटील मळा येथील सिताबाई महेंद्र लोंढे, नाथाचीवाडी येथील गजानन संजय सरोदे,भांडगाव येथील पांडुरंग मधुकर काकडे, निखील व्यंकट भोयर, राहु येथील शिवाजी उर्फ आण्णा नरसिंह भंडारी,धनंजय उर्फ बापु संपत माकर, वाखारी येथील सरोजिनी विक्रम पवार या चौफुला हद्दीत तर बलराम सत्यवान नानावत (रा.वाखारी) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.