शिरूर : महान्यूज लाईव्ह
मांडवगण फराटा(ता.शिरूर) येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रा.दादासाहेब उदमले यांना “जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार” देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघ यांच्या वतीने विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर व तालुक्यातील जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना या पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते,जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंके, सभापती अरुण चौधरी, राजकुमार राऊत यांच्या हस्ते प्रा. दादासाहेब उदमले यांना गुणवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रा दादासाहेब उदमले हे गेल्या तीस वर्षांपासून क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रात विविध क्रीडा प्रकारात तालुका जिल्हा विभाग व राज्य स्तरावर खेळाडू घडविण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रा.रामदास चव्हाण, प्रा. मल्हारी उबाळे, राम फराटे, अमित माने,राजेंद्र पोळ, धनंजय फराटे, सनी खरात, वनिता उदमले, डॉ.श्रुतिका उदमले, ऐश्वर्या खरात, शामकांत चौधरी, त्रिंबक गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.