दिल्ली – महान्यूज लाईव्ह
चंदीगड विद्यापीठात देशातील सर्वात शर्मनाक घटना घडली. एका विद्यार्थिनीनेच विद्यापीठातील ६० विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्डींग करून व्हायरल केला. या व्हायरल व्हिडीओनंतर विद्यापीठातील ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यातील एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे.
मुलींच्या वसतीगृहातील एक विद्यार्थिनीनेच हे कृत्य केले असून ती या वसतीगृहातील विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्डींग करायची व ती सिमल्यातील एका युवकाला पाठवायची. यातून हे व्हिडीओ व्हायरल झाले.
दरम्यान या घटनेनंतर विद्यापीठात मोठा गदारोळ झाला. विद्यार्थिनींनी शनिवारी रात्री निदर्शने केली. राघव चड्डा, भगवंत मान यांच्यापासून विविध राजकीय नेत्यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दुसरीकडे भाजपनेही हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप केला.
यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने संबंधित विद्यार्थिनीला ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस सिमल्यातील संबंधित युवकाचा शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणाच्या पाठीशी नेमके कोण आहेत याचाही शोध घेत आहेत.