सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची आज होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणातच पार पडणार असल्याची माहिती मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते यांनी दिली.
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत. या सभेत विरोधी गट सत्ताधारी संचालकांमध्ये खडाजंगी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र ही केवळ पोकळ चर्चा असल्याचेही मोहिते यांनी स्पष्ट केले.
मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या माध्यमातून पतसंस्थेवर बालाजी कलवले, सुहास मोरे व सदाशिव रणदिवे हे तीन संचालक निवडून गेलेले आहेत. पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीय शिक्षक संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती व 21 /0 अशा प्रकारचे यश मिळवून दिले होते.
पुढील काळात ही सर्व संचालक मंडळाला मागासवर्गीय शिक्षक संघटना सहकार्य करीत राहील असे आश्वासन मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष माहिती यांनी दिले. वार्षिक सर्वसाधारण संचालक मंडळाला मोहिते यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.