कळंब : महान्यूज लाईव्ह
भारत देशापासून सातासमुद्रापार रशियासारख्या बलाढ्य देशात विश्वसाहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे मॉस्को शहरातील रशियन शासकीय वाचनालयाच्या भव्य प्रांगणात पुतळ्याचे लोकार्पण तसेच भारतीय दूतावासात विश्वसाहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.याचे औचित्य साधून डिकसळ (ता. कळंब) येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थितांनी एकमेकांना पेढे, मिठाई भरवून आनंदोत्सव साजरा केला.
रशियात झालेल्या सोहळ्यासाठी भारतासह इतरही देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,आ.सुनिल कांबळे,अमित गोरखे, सुधाकर भालेराव सह आदी मान्यवर उपस्थित होते..
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा उस्मानाबाद जिल्हा कोअर कमिटी अध्यक्ष बालाजी गायकवाड, डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, अफसर पठाण, संजय घोगरे, दत्तात्रय पौळ, संतोष कदम, लक्ष्मण कुचेकर, संतोष गायकवाड, रामदास गायकवाड, श्रावण गायकवाड, दादा गायकवाड,तसेच डिकसळ येथील लहुजी शक्ती सेनेचे शेकडो युवक पदाधिकारी उपस्थित होते.