मुंबई महान्यूज लाईव्ह
जगातील स्मार्टफोन्स २०३० पर्यंत संपतील, त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक टॅट्यू माणसाच्या शरीरात इंटिग्रेड केले जातील असे भाकित मायक्रोसॉप्टच्या निर्मात्यांनी केले आहे. अजून काय काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच आता दोन दिवसा्ंपासून उडणाऱ्या दुचाकीने सर्वांच्या मनावर गारुड केले आहे.
याचा व्हिडीओ येथे पहा..
This is the world's first flying bike. The XTURISMO hoverbike is capable of flying for 40 minutes and can reach speeds of up to 62 mph pic.twitter.com/ZPZSHJsmZm
— Reuters (@Reuters) September 16, 2022
होय, हे अॅनिमेशन नाही, खरोखरच उडणारी दुचाकी बाजारात सज्ज झाली आहे. अर्थात ती सध्यातरी मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी नाही. कारण जपानच्या एअरविन्स कंपनीच्या तंत्रज्ञानाने तयार केलेली ही दुचाकी सध्या ७ लाख ७० हजार डॉलरला म्हणजेच भारतीय रुपयांत ६ कोटी एवढी आहे. अर्थात एअरविन्स कंपनी अशीच परंतू इलेक्ट्रॉनिक दुचाकी निर्माण करीत आहे, ज्याची किंमत ५० हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच ३५ लाखांच्या आसपास असेल. मात्र त्याला अजून चार ते पाच वर्षे लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे या एक्स टुरीझ्मो दुचाकीला जपानच्या
एक्स टुरिझ्मो ही ९७ मैल प्रति तास वेगाने उडू शकते आणि साधारणतः ४० मिनीटे ती दुचाकी सलग उडू शकते. १४६ इंच लांब, ९४.५ इंच रुद व ५९ इंच उंचीची ही दुचाकी सध्या जगभरातील शौकिनांचे आकर्षण बनली आहे. सन २०२२ मध्ये अशा पहिल्या आवृत्तीच्या २०० दुचाक्या एक्स-टुरीझ्मोच्या निघणार आहेत.
डेट्राईट येथे भरवण्यात आलेल्या ऑटो शो मध्ये या दुचाकीचे सादरीकरण झाले. या शोचे उपाध्यक्ष थाड झॉट यांनीच या दुचाकीला उडवून सादरीकऱण केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, यावेळच्या ऑटो शोचे हे मुख्य आकर्षण बनले आहे आणि जगाचे भविष्यही..!