शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर पोलीस स्टेशन वाहतूक शाखेने नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत एकच दिवशी ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शिरूर शहरात अनेक वाहनचालक काळया काचा,तसेच नियमभंग करत वाहनचालवत असतात.यावर कारवाई म्हणून शिरूर शहरामधील बी.जे कॉर्नर, निर्माण प्लाझा, सिटीबोरा कॉलेज रोड अशा गर्दीचे ठिकाणी मोटर सायकलला नंबर नसणे, नंबर प्लेटवर नाव टाकने, ग्रुपचे नाव लिहणे अशा मोटर सायकल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले.
इतर मोटर सायकल चालकांवर विनापरवाना 5 हजार दंड, ट्रिपल सिट एक हजार रुपये दंड, विना कारण हॉर्न वाजवणे एक हजार रुपये दंड अशा प्रकारे एकूण 32 मोटर सायकलवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 65000/- रुपये दंड वाहतूक शाखेने वसूल केला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके यांनी केलेली आहे.तसेच यापुढे कॉलेज रोडला विनाकारण फिरणारे मोटर सायकलस्वार व 18 वर्षाखालील वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी बोलताना सांगितले.