विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामतीच्या २४५ कोटींच्या कामाना स्थगिती दिली. बिबट प्रकल्पाला स्थगिती दिली. बारामतीचाच नाही तर पुणे जिल्ह्याचा आता एवढा मोठा प्रकल्प आपल्या जिल्ह्यातून गेला आणि महाराष्ट्राच्या विरोधात एक षडयंत्र सातत्याने कुठून तरी होतय आणि हे दुर्दैवाचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे सातत्याने आपली खुर्ची वाचवण्यासाठी आपल राज्य पणाला लावतात अशी टीका सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये केली.
त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते महाराष्ट्राला आम्ही गुजरातपेक्षा पुढे नेऊ. त्यावर सुप्रिया सुळे आम्ही वाट बघतोय. अकोल्यामध्ये एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्याचे अंत्यसंस्कार रस्त्यामध्येच करण्यात आले हे अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांमध्ये होणाऱ्या आत्महत्या, कोणाचेही सरकार असलं तरी वास्तव आहे याचा अतिशय गांभीर्याने आणि सगळ्यांनीच मिळून विचार केला पाहिजे.
केंद्र सरकार सातत्याने सगळ्याच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू असं सातत्याने केंद्र सरकार म्हणतंय. अशावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त होतोय याचा केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अतिशय गांभीर्याने विचार करावा.
मुख्यमंत्री हे फक्त कार्यक्रमात व्यस्त असतात आणि अडीच महिने झाले, त्यांचे सरकार येऊनही पालकमंत्री अद्याप नाहीत. अनेक मंत्री असे आहेत जे ऑफिसमध्येही गेलेले नाहीत. त्यामुळे काम तर महाराष्ट्रात अडीच महिने पूर्णपणे बंद आहे. जे पैसे हक्काचे आहेत, बजेट मधले आहेत ते सुद्धा खर्च होत नाहीत. त्यामुळे पूर्णपणे महाराष्ट्राचा काम विकासाच काम पूर्णपणे ठप्प झाल आहे. सरकार येऊन अडीच महिने झाले आहेत. त्यांना कामच करायचं नाही किंवा रुसवे फुगवे आहेत. त्यांनी 50 खोके घेतलेत. त्यांना असं वाटतंय, एकदा 50 ओके घेतले की काम करायची गरजच नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आज मोदींचा वाढदिवस आहे त्यामुळे बाहेरच्या देशातून आठ चित्ते मध्यप्रदेश येथे सोडण्यात येणार आहेत या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, देशामध्ये एखादी चांगली घटना होणार असेल आणि देशाच्या प्रधानमंत्री इंदिराजींच एक स्वप्न पूर्ण होत असेल, तर त्याचं आपण सर्वांनी मिळून स्वागत केलं पाहिजे. याची सुरुवात इंदिरा गांधी यांनी केली होती. तो निर्णय इंदिराजींनी घेतला होता. तो आज पूर्ण होतोय याचा मला मनापासून आनंद आहे.
शिक्षण मंत्री पहिली ते चौथीचा गृहपाठ बंद करण्याच्या विचारात आहेत. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी मी स्वतः त्यांची वेळ मागितलीय. पुढच्या आठवड्यात मी त्यांच्याशी नक्की महाराष्ट्र सरकारच्या मनात काय आहे याची चर्चा करणार आहे. कारण कोविडमध्ये मुलांचे शिक्षणात नुकसान झाले. अजून काही बदल हे फारसे तातडीने करू नयेत. जे करावे ते तज्ञांना विचारून करावे अशी माझी सरकारला विनंती आहे असे त्या म्हणाल्या.