बारामती महान्यूज लाईव्ह
सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.. काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांना गुण लक्षात आले होते. मात्र आज राज्यात शारदानगरची वसुधा गंगाधर फडतरे ही विद्यार्थिनी अव्वल आली.. अन तिच्यासह बारामतीच्या १२ जणांनी सीईटीत अव्वल स्थान मिळवले..
शारदानगरच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजमधील वसुधा हिने १०० पर्सेंटाईल गुण मिळवले व ती राज्यात प्रथम आली. तर तिच्यासह पायल शिंदे हिने ९९.९४, राजेश्वरी तावरे हिने ९९.९२, दिग्विजय रायते याने ९९.९२, वैष्णवी निगडे हिने ९९.४४, अनंत काटे याने ९९.४०, शंतनू देशमुख याने ९९.३९, प्रणव निंबाळकर याने ९९.३७, शंतनू सस्ते याने ९९.२२, प्रतिक जाधव याने ९९.१९, अथर्व कुंभार याने ९९.११, हर्षदा बारसकर याने ९९. ०२ तर प्राची डोंगरे हिने ९९.०१ पर्सेंटाईल गुण मिळवले.
या यशाबद्दल अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे, मुख्याध्यापक सूर्यकांत मुंढे, विभागप्रमुख योगेश झणझणे यांनी या विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
ही तर शारदानगरची खासियत…
विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी विविध विषयतज्ज्ञांचे मार्गगर्शन, ऑनलाईन परीक्षेचा सराव, जादा तास, शंका निरसनासाठी प्राध्यापकांकडून दिला जाणारा अतिरिक्त वेळ, ध्यान व योगा आदी उपक्रम राबवले जातात. त्याचा या विद्यार्थ्यांना फायदा झाला.