कोल्हापूर महान्यूज लाईव्ह
गणेशोत्सव म्हटले की, पुणे, कोल्हापूरचं नाव येतंच.. पण आता कोल्हापूरातल्या भावांनी साऱ्यांच्याच डोळ्याक पाणी आणलं.. गणपतीसाठी सारे भाऊ एवढे तल्लीन झाले होते की, चपला तुटल्या तरी त्याची साधी फिकीर केली नाही.. किती चपल्या तुटल्यान.. म्हणं? मग ऐका उत्तर… पाच डंपर आणि ट्रॅक्टर वेगळंच..! कोल्हापूर चपलांसाठी प्रसिध्द आहेच, पण आता तुटलेल्या चपलांच्या संख्येमुळेही ते अधिक प्रसिध्द होणार हे नक्की..
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता..
कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी एका डंपरमध्ये चौकातील रस्त्यावर ढिग केलेल्या तुटलेल्या चपला भरून नेतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालाय. यामध्ये या चपला भरणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते माहिती देताना दिसताहेत..
एवढे तल्लीन होऊन पोरं नाचून राह्यले की, पाच डंपर सकाळीच भरले आणि ट्रॅक्टर ट्रॉली वेगळेच भरले. रस्त्यावर अगदी दहा- पंधरा फूटाला एक चपलांचा ढिग या व्हिडीओमध्ये दिसतोय. त्यामुळे कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाय.. ही घोषणा अगदी सत्यात उतरताना दिसतेय.
यंदा कोल्हापूरने सगळ्यातच बाजी मारली. विसर्जन करण्यासाठी केलेली क्रेनची व्यवस्था देखील राज्यात भाव खाऊन गेली आहे. कोणी या कन्व्हेअर क्रेनच्या बाबतीत चांगला उपाय म्हणतेय, तर कोणी अशा प्रकारे विसर्जन करायचे असेल तर गणपतीच बसवू नका असा सल्ला देताना दिसतो. मात्र एकंदरीत क्रेनच्या जुगाडाला राज्यभर पसंती मिळाली. कारण यंदा देखील गणपती विसर्जनाच्या वेळी राज्यात २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.