दिल्ली महान्यूज लाईव्ह
द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे आज वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील परमहंसी गंगा आश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.
स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही शोक व्यक्त केला आहे.
हिंदूंच्या श्रध्देचे केंद्रबिंदू असलेले शंकराचार्य सरस्वती हे द्वारका व जोतिर्मठ या पिठांचे शंकराचार्य होते. मध्यप्रदेशातील जबलपूरजवळील एका गावात त्यांचा ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्यांनी धर्मजनजागृतीचे काम हाती घेतले होते.