सब की बारी आती है.. सहा महिन्यानंतर बलाढ्य रशियाला युक्रेनमधील इजियम प्रांतातून घ्यावी लागली माघार…!

महान्यूज इंटरनॅशनल रिपोर्ट

२४ फेब्रुवारीला युध्द सुरू झाले.. आज सहा महिने होत आले आहेत. युक्रेनला उध्वस्त करण्याचा इशारा देणाऱ्या रशियालाच आता युक्रेनमधील खारकीव भागानजिक असलेल्या इजियम प्रांतातून अनपेक्षितरित्या माघार घ्यावी लागली आहे. येथे युक्रेनने वर्चस्व मिळवले आहे.

विशेष म्हणजे रशियन सैन्याला येथेच दारुगोळा व सर्व लष्करी साहित्य सोडून पळून जावे लागले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयानेही याला दुजोरा देत सैन्यदलाला इजियम प्रांतातून माघार घेण्याची परवानगी दिल्याचे स्पष्ट रकेले आहे.

सहा महिन्यानंतर छोटासा युक्रेन रशियाला जड जाऊ लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रशियन सैन्याने ताब्यात घेतलेली राजधानी किव मार्च महिन्यातच युक्रेनने ताब्यात घेतली.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर झेलेंस्की यांनी युक्रेनने रशियाच्या ताब्यातील २ हजार चौरस किलोमीटरचा परिसर मुक्त केल्याची माहिती दिली असून युक्रेनियन सैन्याने उत्तरेकडील रशियाच्या ताब्यातील कुपियांस्क हे शहरही ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

tdadmin

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

1 day ago