दौंड : महान्यूज लाईव्ह
भारताच्या स्वातंत्र लढ्यातील पहिला अध्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या २३१ वी जयंती दौंड तालुक्यातील पाटस, गार, दापोडी नानगाव, यवत, कुसेगाव, वरवंड आधी गावांमध्ये विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विविध संघटनांनी राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले. इंग्रज राजवटी विरोधात बंड पुकारून इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारे नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३१ व्या जयंती निमित्त पाटस येथील राजे उमाजी नाईक क्रांती स्तंभाजवळ उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
जेजुरी गड ते पाटस अशी क्रांतीज्योतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उमाजी नाईक यांच्या प्रतिमेची हलगीच्या गजरात वाजतगाजत, फटाक्याची आतिषबाजी व भंडाऱ्याची उधळण करत उमाजी नाईकांचा जयघोष करत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
पाटस परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर सायंकाळी आद्यक्रांती उमाजी नाईक यांच्या जीवन संघर्षातून बहुजन समाजाने काय प्रेरणा घ्यावी ? या विषयावर प्रा. रमेश कुसाळकर यांनी व्याख्यान सादर केले.
यावेळी कुसाळकर यांनी उमाजी नाईक यांच्या इतिहासातील चुकीच्या त्रुटी व खरा इतिहास विविध दाखले देत उपस्थितींच्या समोर मांडला. तत्पूर्वी कुमारी प्रज्ञा झेंडे हिने उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून उपस्थितांना दिली.
यावेळी सरपंच अवंतिका शितोळे, उपसरपंच राजेश सोनवणे, माजी सरपंच योगेंद्र शितोळे, जयंत पाटील, दादासाहेब खोमणे, गोरख सुतार, शंकर पवार, बाळासाहेब भंडलकर, धनंजय भंडलकर, रामदास भागवत, सुरेश वाबळे, हनुमंत चव्हाण, अशोक पानसरे, छगन मस्के,पप्पु पोळेकर, बाळासाहेब तोंडे पाटील तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान तालुक्यातील दापोडी येथे ही उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रा. सचिन झगडे यांचे व्याख्यान पार पडले तसेच गार, नानगाव, यवत, वरवंड, कुसेगाव या ठिकाणी उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांनी विविध कार्यक्रम साजरी करत अभिवादन केले.