शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर हवेली चे माजी आमदार कै बाबुराव पाचर्णे हे विकासकामासाठी नेहमी अग्रेसर होते, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिरूरमध्ये अनेक विकासकामे केली. भारतीय जनता पक्षानेही त्यांच्या मागणीला नेहमी झुकते माप दिले आहे. आणि यापुढेही त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार असल्याचे मत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
काही दिवसापुर्वी माजी आमदार कै बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले होते. पुणे येथील पाचर्णे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटूंबीयांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या निवासस्थानी जाऊन पाचर्णे कुटुंबियांचे सांत्वन करून स्व. आमदार पाचर्णे यांना आदरांजली वाहिली. स्व. आमदार पाचर्णे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या पुढे पाचर्णे कुटूंबीयांसाठी पक्षाच्या वतीने त्यांना नेहमी सहकार्य राहणार आहे असे आश्वासन त्यांनी पाचर्णे यांच्या पत्नी श्रीमती मालती व मुलगा राहुल पाचर्णे यांना दिले. अर्धातास ते पाचर्णे यांच्या आठवणीत रमले होते. यावेळी पाचर्णे यांची मुलगी निलीमा शेळके, स्नुषा मेघना पाचर्णे व कार्यकर्ते उपस्थित होते.