विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : आज शहरीकरणाच्या नावाने होत असलेली भरमसाठ वृक्ष तोड त्याचे भविष्यात होणारे मानवी जीवनावर परिणाम ग्लोबल शेपर्सचे संकेत भोसले यांनी सीड बॉल ॲक्टिविटी च्या निमित्ताने विद्यार्थांना मार्गदर्शन करून महत्व पटवून दिले.
या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थांनी २०० सीड बॉल बनवले. यामध्ये शाळेन मोलाचं सहकार्य केलं. या शाळेत मतिमंद व मूकबधीर विद्यार्थांना त्यांना समजेल अशा भाषेत या सिड बॉल ॲक्टिविटीचे महत्व समजून सांगण्यास शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावली.
सीड बॉल साठी लागणारी सेंद्रिय खत मिश्रित माती , विविध वृक्षांच्या बिया व इतर साहित्य देवयानी पवार संचालित इसेंसीयल ग्रीन मार्फत उपलब्ध करून देण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी बनवलेले हे सर्व सीड बॉल नैसर्गिक ठिकाणी टाकले जातील अशी माहिती स्नेहा साळुंखे यांनी दिली. इसेंसीयल ग्रीन मार्फत शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेंद्रिय पद्धतीच्या फळ-भाज्यांचे बी देण्यात आले.
ग्लोबल शेपर्स कॅमुनिटी बारामती हब यांच्या वतीने विशेष विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले.तसेच शाळेच्या सहकार्याबद्दल मुकबधिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खैरे, मतिमंद विभागाचे फनकांबळे व सौ.शिवानी काळे यांना तुळस आयुर्वेदिक वृक्ष देऊन आभार मानण्यात आले.
सीड बॉल ॲक्टिविटी ही संकल्पना देवयानी पवार क्युरेटर फातेमा कायमखाणे, शेपर्स अक्षय घोलप, शंतनु जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या प्रसंगी बारामती हबच्या व्हाइस क्युरेटर स्नेहा साळुंके तसेच शेपर्स भार्वि मुलमुले, अखिल सूर्यवंशी, संकेत भोसले, अंगद शहा, शेखर भोसले, रविराज धुमाळ उपस्थित होते.