विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
नटराज नाट्य कला मंडळ बारामती व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बारामती शाखा यांच्या वतीने दिनांक 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2022 रोजी नाट्य अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री किरण गुजर यांनी दिली.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक अभिनेते नाट्यशिक्षक चित्रपट व मालिकांचे लेखक श्री संभाजी सावंत हे शिबिरार्थींना प्रशिक्षण देणार आहेत या नाट्य शिबिरामध्ये शिबिरार्थींना नाटक मालिका चित्रपट यामध्ये काम करण्याकरिता आवश्यक असणाऱ्या बाबी शिकविल्या जाणार आहेत. शिबिर सकाळ व संध्याकाळ असे दोन सत्रांमध्ये असणार आहे.
या शिबिरामुळे बारामतीकरांना मोठी संधी या निमित्ताने चालून आलेली आहे तरी या नाट्य अभिनय प्रशिक्षण शिबिराचा जास्तीत जास्त बारामतीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिर नटराज कलादालन येथे संपन्न होणार आहे. अधिक माहिती करिता विवेक पांडकर ( – मो. ८७८८४२५४८२) व प्रदीप परकाळे (- मो. ९२२७१७०५९९) यांच्याशी संपर्क साधा असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.