मुंबई महान्यूज लाईव्ह
पाहता पाहता गौतम अदानी यांनी प्रचंड पैसा मिळवला असून त्यांच्या कंपन्यांनी जबरदस्त नफा मिळवला आहे. त्यांची संपत्ती एकाच आठवड्यात एवढी वाढली की, त्यांनी जगातील चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत जेफ बेजोस यांना पाठीमागे टाकून त्यांनी अदानी ग्रुपचा डंका जगात वाजवला आहे.
अदानी यांची संपत्ती आता १४८.८ अब्ज डॉलर एवढी झाली असून तिसऱ्या क्रमांकावरील अॅमेझॉनचे झेफ बेजोस यांची संपत्ती आता १३६.७ अब्ज डॉलर एवढी आहे. आता अदानी लवकरच तिसरा क्रमांकही पादाक्रांत करतील अशी चिन्हे आहेत.
अर्थात एकीकडे ते जगातील सर्वात श्रीमंतांपैकी तिसरे श्रीमंत ठरले असतानाच त्यांच्या कंपन्यांवरील कर्जाचा बोजाही वाढतोय. मात्र तरीदेखील त्यांची श्रीमंती व संपत्ती वाढतच चालली आहे. आता त्यांच्यापुढे केवळ टेस्लाचे एलन मस्क व बर्नार्ड अर्नाल्ट हे दोघेच उरले आहेत.