विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
केंद्रीय नेतृत्वने हा निर्णय घेतलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये १६ लोकसभेचे मतदार संघ आणि देशांमध्ये १४४ लोकसभेचे मतदार संघ हे जे कमी झालेले आहेत. त्या मतदारसंघांमध्ये आपल्या पक्षाची ताकद कशी वाढेल असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यामध्येच बारामतीचा मतदार संघ आहे. बारामती मतदारसंघांमध्ये जर आपल्याला विजय मिळवायचा असेल, तर काही गोष्टी आपल्याला आत्तापासून कराव्या लागतील. त्यासाठी आपल्याला बुथपासून काम करावे लागणार आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीमध्ये सांगितले.
२२ ते २४ सप्टेंबर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या भागामध्ये येणार आहेत. भारतीय जनता पार्टीचा हा पहिला प्रदेशाध्यक्ष आहे, ज्याने बुथ संघटनेची सुरुवात काटेवाडीपासून केली. प्रचंड उत्साह लोकांमध्ये होता. पुढारी यायला घाबरतात. सामान्य माणसं घाबरत नाहीत, म्हणून बूथ वरील संघटन आपल्याला करावं लागेल. तो अजेडा घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांचा पायगुणच असा आहे की, ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि महाराष्ट्रमध्ये सत्तांतर झालं. आता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निर्माण झालं आहे. चंद्रशेखर बावनखुळे हे हाडाचा कार्यकर्ता असून १९९४-२००४ पासून नागपूर जिल्हा परिषदेमध्ये एक प्रभावी जिल्हा परिषदेचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे.
त्यानंतर नागपूरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केले. ओबीसी समाजाकरिता त्यांचे योगदान फार मोठे आहे.
आणि पक्षाची संघटनाची जबाबदारी आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांच्यावर आली. आम्हाला विश्वास आहे की, आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही.
बऱ्याच तालुक्यामध्ये मतदानाच्या दिवशी आपली यंत्रणा सक्षम नसते. आपला कार्यकर्ता शेवटच्या दोन दिवसांमध्ये कमी पडतो.आणि मग काय घडतं हे आपल्याला वेगळं सांगायची आवश्यकता नाही.
निवडणुका काय आज आहेत अशातला भाग नाही गेली. अनेक वर्ष आपण निवडणुका लढवलेल्या आहेत. निवडणुकांमध्ये भाग घेतलेला आहे. म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेब चिंता करू नका. देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. एक वेगळे परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही. असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
आता सरकार बदलले. अजूनही आमच्या जिल्ह्यामध्ये सरकार बदलले आहे असं वाटत नाही. हे जरा गांभीर्याने घ्यावे लागणार आहे. मागच्या अडीच वर्षांमध्ये एक जरी अर्ज कुणी कार्यकर्त्यांनी दिला. तर तो अर्ज फेकून दिला जायचा. पण आज विरोधी पक्षातले काही लोक आपल्या नेत्यांना भेटतात म्हणतात, मी तुमचाच आहे, कोणी सत्कार करतोय, कोणी हार घालतोय. त्यावरून इथली परिस्थिती लक्षात येईल असं पाटील म्हणाले.
साधा ग्रामपंचायतचा एक सदस्य फुटू शकत नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० आमदाराच पाठबळ आणि त्याला भारतीय जनता पार्टीचे १२० आमदारांचा पाठबळ यावर शिंदे आणि भाजपचे सरकार महाराष्ट्रामध्ये आल.त्यामुळे चिंता करू नका आपली जी कामे असतील ती कामे करण्यात ठामपणे पाठीशी उभा राहू. बोलण्यापेक्षा कृती मधून ह्या गोष्टी करून दाखवाव्या लागतील.
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची शपथ सर्वजन केल्याशिवाय राहणार नाही.असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी दिला.