महान्यूज वेदर अपडेट
नारळी पौर्णिमेनंतर बऱ्यापैकी थंडावलेला पाऊस आता पुन्हा येतोय.. गणरायाच्या स्वागतादिवशीच पश्चिम महाराष्ट्रासह खानदेश व मराठवाड्यात जोरदार व मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम तीव्र स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहर व परिसरात वाढीव तापमानामुळे वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सध्या पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून परतीच्या पावसाचा पहिला परिणाम उद्या दिसण्याची शक्यता आहे. अर्थातच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या हिमालयीन भागात तसेच पश्चिम बंगाल, तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, लक्षद्विप, जम्मू आणि काश्मिर, उत्तराखंड आदी राज्यातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.