दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे किरकोळ कारणावरून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात खडी फोडायचा लोखंडी घन (हातोडा) घातला. या जीवघेण्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी पतीविरोधात मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
ही माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली. वसंत व्यंकप्पा चौगुले (रा.पाटस, ता.दौंड, जि.पुणे ) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी अधिक माहिती दिली.
शामल चौगुले या घरात झोपलेल्या असताना पती वसंत यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात खडी फोडण्याच्या लाकडी दांडके असलेल्या लोखंडी घनाने तीन वेळा वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर स्वरूपात जखमी झाल्या असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी (दि.२७) रात्री पावणे अकरा वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. याबाबत शामल यांचा मुलगा गणेश याने फिर्याद दिल्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी हत्याराने हल्ला केल्याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे याप्रकरणाचा तपास करत आहेत.