मुंबई महान्यूज लाईव्ह
कधी नव्हे ते भारत पाकिस्तान समोर आलेले.. दुबईतील इंटरनॅशनल स्टेडिअममधील या सामन्यात पहिल्या चेंडूपासूनच थरारक सामन्याचा प्रत्यय येत होता.. त्यातच भारताची फलंदाजी सुरू झाल्यानंतर शेवटच्या १२ चेंडूत २१ धावा.. मग शेवटच्या षटकात ७ धावा.. आणि हार्दिक पंड्याचा १९ व्या षटकातील तीन चौकार.. चौथ्या चेंडूवर षटकार.. भारताने एक थरारक सामना जिंकला.. रस्त्यावर देशभरातील तरुणाई आली.. अगदी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सामना जिंकला आणि सेलिब्रेशनही केले..
शरद पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी अपलोड केलेला हा व्हिडिओ..
या सामन्यात भारताने ऱ्हिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला खेळवले हा मुद्दा महत्वाचा ठरला. रवींद्र जडेजा हा चौथ्या क्र्मांकावर फलंदाजीला आला. त्याने ३५ धावा करीत आपली निवड सार्थ ठरवली. जर ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक दोघेही असते, तर रवींद्र जडेजा खेळू शकला नसता, मात्र रवींद्र जडेजाचे या सामन्यातील योगदान पाहता भारतीय संघाने केलेली निवड सार्थ ठरली. जडेजाच्या गोलंदाजीत दोन षटकात त्याने अवघ्या ११ धावा दिल्या.
हा सामना सुरू होण्यापूर्वी जर भारताने पहिल्या तीन षटकात पाकिस्तानची विकेट काढली.. त्यातही बाबर आझमची काढली, तर भारत जिंकण्याची शक्यता अधिक असा जो अंदाज करण्यात आला, त्यामध्ये भुवनेश्वरकुमारने मोठी बाजी मारली. त्याने बाबर आझमची विकेट काढून भारताला जो आनंद दिला. त्या धक्क्यातून पाकिस्तानचा संघ सावरलाच नाही..
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानला १४७ धावांवर रोखताना पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णयही भारताच्या पथ्यावर पडला. ११ व्या क्रमांकावर आलेला पाकिस्तानचा दहानी याने तब्बल १६ धावा केल्या. मात्र अर्शदिप सिंगने यार्कर टाकून दहानीचा बळी मिळवला.. अशावेळी जर दहानीने आणखी एखादा चौकार किंवा षटकार मारला असता, तर? हा प्रश्न लक्षात घेता अर्शदिपने बजावलेले योगदानही महत्वाचे ठरले.