दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामंपचायतीची मासीक मिटींग चालू असताना सरपंचांना बौध्द विहाराच्या निकृष्ट कामाचा जाब विचारल्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य विशाल बारवकर व अक्षय बारवकर या दोघांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सरपंचांना अश्लिल भाषेत शिविगाळ करीत विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही परस्परविरोधी तक्रार आल्याने पाटस पोलीस चौकीला गुन्हे दाखल झाले आहेत. अशी माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देऊळगाव गाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये २५ ऑगस्ट रोजी मासिक मीटिंग सुरू असताना संतोष विक्रांत मोरे यांनी बुद्ध विहारासमोरील बसवलेले पेव्हर ब्लाॅक हे निकृष्ट दर्जाचे असतानाही बिल कसे निघाले? असे सरपंच यांना विचारले.
तेव्हा तेथे बसलेले ग्रामपंचायत सदस्य विशाल बारवकर याने तु हा विषय येथे काढु नको, हा अजेंडयाचा विषय नाही, ते काम व्यवस्थील झालेले आहे, तुझी लायकी नाही,मिटींग संपल्यावर तुला बघुन घेतो, असे बोलत मी बिल काढले आहे तुला काय करायचे ते कर ’’ असे जातीवाचक व अपमान होईल असे बोलला व लगेच दुसरा ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारवकर हे दोघेेेे उठुन माझ्या अंगावर धावुन आले . अशी फिर्याद संतोष विक्रांत मोरे यांनी पाटस चौकीत दिल्याने ग्रामपंचायत सदस्य विशाल बारकर व अक्षय बारकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
तर संतोष विक्रम मोरे, सोमनाथ दिगंबर मोरे,अरविंद विठठल मोरे ,सचिन विक्रम मोरे (सर्व रा देउळगाव गाडा ता.दौंड जि.पुणे) यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देऊळगावगाडा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये
मासिक मिटिंग मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी सचिन विक्रम मोरे याने ग्रामपंचायतच्या सरकारी पैशाचा अपहार केल्याने त्याच्याबददल चर्चा होवुन त्याच्यावर निलंबन करण्याचा ठराव मंजुर केला.
या कारणावरुन आरोपींनी सरपंच यांना अश्रलील भाषेत शिवीगाळ करून हात धरून खुर्चीवरून बाजुला केले तर तर रस्त्यावर उभ्या असताना आरोपींनी तिथे येऊन विनयभंग केल्याची तक्रार त्यांनी पाटस पोलीस चौकीत दिल्याने चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.