बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव कारखान्याच्या सभासदांनी मागील गळीत हंगामासाठी दिलेल्या ऊसासाठी कारखान्याने प्रतिटन रु.३१०० हा अंतीम दर जाहिर केला आहे. आज बुधवार दि. २४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी हा ऊस दर जाहिर केला.
माळेगाव कारखान्याने याअगोदरच एफआरपीचे रु.२७८० व कांडेबील रु.१०० असे एकुण प्रतीटन रु.२८८० इतकी रक्कम सभासदांना दिलेली आहे. आता उर्वरित प्रतिटन रु.२२० ही रक्कम दिवाळीपर्यंत सभासदांना देण्यात येणार आहे.
बारामती तालु्क्यातील सोमेश्वर कारखान्याने अंतीम भाव रु.३०२० प्रतिटन जाहीर केला आहे. माळेगाव कारखान्याने सोमेश्वरपेक्षा ८० रुपये जास्त दिले आहेत. एकुणच यावर्षी भावाच्या स्पर्धेत माळेगाव कारखान्याने बाजी मारली आहे.