विक्रम वरे
बारामती : महान्यूज लाईव्ह
पन्नास खोके ऑल ओकेवाले हे सरकार आहे. या सरकारची सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता आलेली नाही. सत्ता ओरबाडून त्यांनी घेतलीय हे दुर्दैव आहे. यात सर्वसामान्य महाराष्ट्राची जनता भरडलीय. सुप्रिया सुळे सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर पत्रकारांची संवाद साधला यावेळी सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
लोक आज महागाईमध्ये भरडलेत, मूलभूत आव्हाने जी त्यांच्यासमोर आहेत ती सोडून लोकांना सातत्याने कुठेतरी बिझी ठेवायच आणि मूळ मुद्दे बाजूला करायचे. ही त्यांची अनेक वर्षांची खासियत आहे. ही खासियत मी दिल्लीत फार जवळून पाहतेय त्यामुळे मला आश्चर्य वाटत नाही,असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसेच महिला अत्याचार रोखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. या भागातील एसपी अतिशय उत्तम काम करत आहेत. सामाजिक प्रश्न म्हणून आपण सर्वांनी मिळून याच्याकडे पाहिला पाहिजे. पोलिसांचं काम अतिशय उत्तम आहे, आपण सर्वांनी मिळून हे कसं थांबेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.