सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.स्पर्धेत या संस्थेच्या सहभाग घेतलेल्या एकूण 24 विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, पाच विद्यार्थ्यांनी रौप्य व सहा विद्यार्थ्यांनी कास्य पदकांची कमाई केली. यामुळे लाखेवाडी च्या जय भवानी गड विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवला गेला आहे.
इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे दिनांक १८ व १९ऑगस्ट रोजी या राज्यस्तरीय कुराश स्पर्धा पार पडल्या.
ज्ञानेश्वरी जामवंत ढोले, श्रावणी हरिभाऊ भाळे या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले. तर अमृता आप्पासाहेब पडळकर, प्रतीक्षा नारायण ढोले, हिंदवी आप्पासो केचे, संकल्प अभिजीत खाडे, आर्यन सतीश भोसले या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले तर राजनंदनी रिगाजी काळे, सृष्टी हर्षवर्धन पवार, शर्वरी दादासो जाधव, प्रणव संतोष कुदळे, सिद्धार्थ तानाजी सानप, ओंकार भागवत साठे या सहा विद्यार्थ्यांनी कास्य पदक पटकावले.
त्याचप्रमाणे संस्थेच्या यश सतीश भोसले, प्रबुद्ध राहुल कांबळे,मनोज प्रशांत मोरे, इंद्रनील संतोष देशमुख, ज्ञानराज रामचंद्र अभंग, कौस्तुभ मनोजकुमार ढोले, सुरज संदीप शिंदे, पृथ्वीराज दयानंद चव्हाण, क्षितिज राहुल जगताप, विश्वतेज सतीश महाजन, वरद सोलनकर इत्यादी विद्यार्थ्यांनी कुराश स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर, उपाध्यक्ष सौ .चित्रलेखा ढोले मॅडम, सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, प्रशासक गणेश पवार सर, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक शिवराज तलवारे सर ,सर्व विभागाचे सुपरवायझर , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.व राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.