बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरात आज एक दुर्दैवी घटना घडली. यामध्ये नऊ वर्षीय मुलाचा नीरा डाव्या कालव्यात पडून बुडाल्याने मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.
बारामती शहरातील रम्यनगरी अपार्टमेंट येथे राहत असलेल्या नऊ वर्षीय सौरभ उर्फ स्वराज गिरीमकर या मुलाचा मृतदेह आज दुपारी निरा डाव्या कालव्यात आढळून आला.
स्वराज हा खेळता खेळता पाण्यात बुडाला असावा असा अंदाज असून, तो आढळून न आल्याने त्याचे पालक त्याला शोधत होते. मात्र दुर्दैवाने त्याचा मृतदेह थेट निरा डावा कालव्यात आढळला. या घटनेने बारामतीत हळूहळू व्यक्त केले जात होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.