अनिल गवळी – महान्यूज लाईव्ह
श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्या. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. या बोटी ऑस्ट्रेलियन व्यक्तीच्या मालकीच्या असून पोलिस अधिकाऱ्यांना यामध्ये तीन एके -४७ रायफल व रायफल दारुगोळा व काही कागदपत्रे आढळली.

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे.
या बोटीची चौकशी कोस्टगार्डने केली. त्यानुसार ही बोट लेडीहान नावाची असून ऑस्ट्रेलियन नागरीक हॅना लॉर्डगन यांची आहे. त्यांचे पती जेम्स हॉबर्ड हे या बोटीचे कॅप्टन असून ती बोट ओमानमधील मस्कतहून युरोपकडे निघाली होती. मात्र तिचे इंजिन निकामी झाले. यानंतर बोटीतील खलाशांनी मदतीसाठी विचारणा केली होती. त्यावरून कोरियन युध्दनौकेने या बोटीवरील खलाशांची सुटका केली. समुद्रात भरकटत ही नौका हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली,