विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
पुरंदर तालुक्यात असलेले नाझरे धरण यावर्षी झालेल्या पावसामुळे १०० टक्के भरले आहे.त्यामुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यातील जिरायत भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या धरणावर अवलंबून असलेल्या गावे व वाड्यावस्त्यांची पाण्याची सोय झाली आहे. ७८८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या नाझरे धरणावर तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. या योजनेतून पुरंदर, बारामती तालुक्यातील गावे, वाडी – वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो.
धरण भरल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा तात्पुरती का होईना सोय झाली आहे. धरण परिसरातील असलेले लहान मोठे पाझर तलाव भरले जाणार आहेत. यावर्षी लवकर धरण भरल्याने शेतकरीही समाधानी आहेत. आता कऱ्हा नदीत पाणीही सोडण्यास सुरवात झाली असल्याने यावर्षी कऱ्हा नदीवरील बंधारेही यावर्षी शेतकऱ्यांना व शेतीला मोठा दिलासा देणार आहेत.