मुंबई महान्यूज लाईव्ह
मुंबई भाजपचा नेता मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भ्रष्टाचाराचा भंडाफोड करणार असल्याचे ट्विट करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असली तरी राष्ट्रवादी त्यातून अधिकच आक्रमक झाली आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी कंबोज यांना थेट इशारा देत कंबोज यंत्रणेला हाताशी धरून धमकी कोणाला देतोय असा सवाल केला आहे. आमच्या नादाला लागला, तर आम्ही बैल नांगरासकट लावतो. तुझी सत्तेची मस्ती आणि माज उतरायला वेळ लागणार नाही. आ देखे जरा किसमे कितना है दम असा इशारा देणारे ट्विट केले आहे.
दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील मोहित कंबोज यांच्यावर टिका करीत कंबोज भाजपचे भोंगे आहेत. शेतकरी, जीएसटीवर काही बोलत नाहीत. मग त्यांनी ईडीच्या दारात बसून ही माहिती जमा केली असेच दिसते. मोहित कंबोज कोणाच्या चड्डीचा नाडा आहे हे सर्वांनाच माहिती आहे. जो जर पत्रकार परिषद घेत असेल, ईडीच्या धाडीची माहिती देत असेल तर हे संशयास्पद व गंभीर असल्याचे मत व्यक्त केले आहे.